शनिवार, १७ डिसेंबर, २०२२

वाटूर येथे महापरिनिर्वाणदिनी भव्य रक्तदान शिबिर संपन्न.

वाटूर येथे महापरिनिर्वाणदिनी भव्य रक्तदान शिबिर संपन्न.


वाटूर प्रतिनिधी /

      वाटूर फाटा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाणदिनी सम्यक संकल्प बहुउद्धेशीय सेवाभावी संस्था आकणीच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षीही वाटूर फाटा येथे संस्थाध्यक्ष अनिल मोरे यांच्या नेतृत्वात अभिवादन सभा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल होते.
         कार्यक्रमारंभी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अभिवादन सभेस वाटूर येथील जेष्ठ नागरिक विक्रम नाना माने , गणपत वारे, वाटूरच उपसरपंच बद्रीभाऊ खवणे, युवा नेते नितीन जेथलिया, परतूरचे पोलीस उपनिरीक्षक पुंडगे साहेब.,  अ.जा.विभागाचे प्रदेश सरचिटणीस मा.बाळासाहेब अंभिरे,  डॉ.गजानन केशरखाने सरपंच वाटुर, सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ वटाणे, साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर ,माजी सभापती सुशिला अंभिरे, लक्ष्मण शिंदे तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस, नजीरभाई पटेल, मदन हजारे, डॉ.नरेंद्र केशरखाने ,महादेव जनकवार,  जगदीश पडुळकर ग्रा.प. सदस्य , गौतम डावरे , बाळासाहेब सातपुते , संदेश मोरे, तात्याराव ढगे, अनिल  वटाणे, शाहुराव शेंडगे , श्याम खोंड तालुका व्यवस्थापक पंचायत समिती मंठा, गणेश खरात, रतन सिरसाट (वंचित बहुजन आघाडी) संजय सिरसाट , गणेश सोनवणे , प्रकाश साळवे, कारभारी सातपुते, अतुल खरात, महेंद्र टेकुळे , राजेश सय्यद ,तय्यब पठाण, दत्ता भद्रगे , एकनाथ राऊत अध्यक्ष आधार संस्था ,राजू आवारे, संदीप दाभाडे तालुका व्यवस्थापक परतूर , लक्ष्मण शिंदे एम.आय.एस परतूर, आदी मान्यवर उपस्थित होते.


     या शिबिरात ६३ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे आयोजक ऍड.अनिल मोरे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...