महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मंठा येथे धरणे आंदोलन
बिहार सरकार जागे व्हा ! अन्यथा आंदोलन तीव्र करू ।
मंठा येथील आंदोलनकर्त्यांचा इशारा
मंठा /प्रतिनिधी
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मंठा शहरातील व तालुक्यातील बहुसंख्य बौद्ध बांधवांनी धरणे व आंदोलन केले (दि.१२) रोजी करण्यात आलेल्या आंदोलनात मंठा तालुक्यातील संपूर्ण बौद्ध बांधव आपले पक्षीय हेवेदावे बाजूला ठेवून या आंदोलनात सहभागी झाले होते.
या आंदोलनाची रॅली १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकातून घोषणा देत मुख्य रस्त्याने निघाली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात छ. शिवरायांच्या स्मारकाला वंदन करून विसर्जित झालेल्या रॅलीचे रूपांतर धरणे आंदोलनात झाले.
भारतीय बौद्ध महासभा शाखा मंठा व वंचित आघाडी मंठा तालुका च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पूज्य भदंत डी.शीलरत्न थेरो यांच्या उपस्थितीत धरणे व निदर्शने करण्यात आली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पूज्य भदंत डि.शिलरत्न थेरो म्हणाले की, मंदिर,मस्जिद, गुरुद्वार, चर्च इत्यादी धार्मिक स्थळे ही जशी ज्या त्या धर्माच्या ताब्यात असतात ; परंतु बौद्धगया हे एकमेव महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात नाही...१९४९ चा बुद्धगया मंदिर कायदा रद्द करून महाबोधी महाविहार लवकरात लवकर बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे.
युनोस्को' कायद्यानुसार बुद्धगया येथील महाबोधी महाविहार ही जागतिक धरोहर असूनही ही बौद्ध विरासत सध्या ब्राह्मणाच्या ताब्यात असल्याने संविधान कलम १३,१४,१५,२५ .व २६ च्या कलमांचे पूर्णतः उल्लंघन आहे.
याठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्याने सम्राट अशोकांनी निर्माण केलेले हे महाविहार जगातील सर्वच बुद्ध अनुयायींच्या अस्मितेचा विषय आहे म्हणून आता कोणत्याही परिस्थितीमध्ये हे महाबोधि विहार मुक्त करून घेण्याची योग्य वेळ आलेली आहे असे भदंत डि.शिलरत्न म्हणाले.
यावेळी डॉ.धोंडोपंत मानवतकर म्हणाले की, सम्राट अशोक यांनी चोऱ्यांशी हजार बांधलेले स्तूप गेले कुठे ? तर त्या सर्व ८४ हजार स्तूपांचे रुपांतर मंदिरात करण्यात आले असल्याचे उघड दिसते. या बौद्ध धम्मीय विरासतीला आता या विद्यमान सरकारने आमच्या ताब्यात द्यावे. डॉ.किशोर त्रिभुवन म्हणाले की, आमची ही मालमत्ता परत मिळविण्यासाठी आम्ही हा लढा एकजुटीने लढण्याची योग्य वेळ आलेली आहे. रंगनाथ बापू वटाणे, भारत उघडे, सुभाष जाधव,अंबादास खरात, लक्ष्मणराव वाघमारे यांनीही आंदोलनप्रसंगी आपला आक्रोश मनोगतातून व्यक्त केला.
अध्यक्षीय समारोपात प्रा.सोनाजी कामिटे म्हणाले की,बुध्दगया महाबोधी विहार हे केवळ भारत देशाचेच नव्हे, तर जगभरातील बौद्धांचे श्रध्दास्थान असून महाविहाराचे व्यवस्थापन हे बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे, ते गैरबौद्धांपासून मुक्त करण्यात यावे, यासाठी हे आंदोलन आता थांबणार नाही. तर तीव्र करण्यात येईल याची बिहार सरकारने नोंद घ्यावी.
भारताच्या महामहीम राष्ट्रपतीं यांच्या नांवे देण्यात आलेले निवेदन मंठा तहसिलचे नायब तहसिलदार काळदाते यांनी कार्यकर्त्यांकडून स्वीकारले. या निवेदनावर अरुण वाघमारे,दत्तराव चोरमारे,गौतम सदावर्ते,गौतम अंभोरे,रमेश खरात,शरद मोरे,नंदकिशोर प्रधान,अशोक अवचार,दीपक शेळके,विठ्ठल ठाकरगे,गंगाराम गवळी,सिद्धार्थ खरात,सहदेव अंभोरे,मिलिंद अंभोरे,सुमेध आवारे,करण वटाणे,अजय गोंडगे,शुभम अंभोरे,अशोक रणवीर,विकास प्रधान,नितीन खाडे,विश्वंबर वटाणे,भगवान वाघ,किरण गवळी,शुभम वाघमारे,मंगेश गवळी,स्वप्नील गोंडगे,धम्मानंद वाघमारे, दीपक बनसोडे,यश जाधव,सचिन खंदारे,भीमराव मुंढे,नरेंद्र वाघमारे,दादाराव वाघमारे,व्ही.बी मोरे,महेंद्र मोरे,ज्योती खाडे,जया आखाडे,वर्षा आखाडे, छाया खरात,सुषमा मगर,चंद्रकला कांबळे,विमल गायकवाड, सुशीला बनसोडे,मगर संगीता, गायकवाड,कांता कांबळे,सुनीता कोल्हे,सरस्वती कांबळे,प्रयागबाई कांबळे, बायजाबाई चोरमारे,कविता मोरे,मनोरमा पंडित,रचना मोरे,उज्वला मोरे, रेखा प्रधान,रमा वाघमारे,अनिता वाघमारे,आदिती खरात,आदिती खंदारे,अक्षरा वाघमारे,पूर्वी खंदारे,अमित खरात उद्धव सरोदे, गोलू पांजगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शांततेत पार पडलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र टेकुळे यांनी केले, तर अतुल खरात यांनी आंदोलनात सहभागी बांधवांचे आभार मानले. धरणे, आंदोलनाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा