शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

अहिंसक वाघमारे यांची मुंबई म्हाडा येथे सहा.अभियंता म्हणून निवड मंठ्यात भव्य सत्कार..!

अहिंसक वाघमारे यांची 

मुंबई म्हाडा येथे 

सहा.अभियंता म्हणून निवड 

मंठ्यात भव्य सत्कार..!


मंठा प्रतिनिधी /

            मंठा येथील युवापिढीचा आदर्श ठरलेला तरुण युवक अहिंसक वाघमारे यांचा "मंठा शिक्षण प्रसारक मंडळ" च्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
      मंठा परिसरात उच्च शिक्षणाचे महत्व वाढावे व नवयुवकांना उच्च वैज्ञानिक शिक्षण घेण्याकरिता प्रेरणा मिळावी या सद्हेतुने नुकतीच निवड झालेले सहाय्यक अभियंता अहिंसक वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ.धोडोपंत मानवतकर, डॉ.प्रताप चाटसे, कार्यकर्ता प्रकाश अण्णा घुले, प्रा. राघव गायकवाड़, प्रा.राजेश गायकवाड़, डॉ. प्रवीण माळेगांवकर, अॅड. सिद्धार्थ अवसरमोल, ऐड. अनिल मोरे, बौद्धाचार्य नितीन वाघमारे, सुनिल जाधव व महेंद्र टेकुळे, पत्रकार अतुल खरात, हाफिज बागवान, सिद्धार्थ मोरे, नाना वाघमारे, मारोती खनपटे, राज खनपटे,विलास काऊतकर, निलेश मोरे, भगवान वाघ, अजय गायकवाड, जयश्री पवार, मुकुंद खनपटे व इतर युवा कार्यकर्ते उपस्थित होते. 
       अहिंसक वाघमारे यांनी सत्कारारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आपले मनोगत व्यक्त केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून  महाराष्ट्रात एस.सी. प्रवर्गातून प्रथम स्थान मिळवून मुंबई म्हाडाच्या सहाय्यक अभियंतापदी निवड झाल्याचे सांगितले. 
        मंठ्यासारख्या शैक्षणिक मागास भागात राहून कोणतेही ट्युशन न घेता एवढे भव्यदिव्य यश संपादन केल्याने सर्व उपस्थित मान्यवरांनी अहिंसक वाघमारे यांचा गौरव केला. 
      यावेळी डॉ. धोंडोपंत मानवतकर, डॉ.प्रताप चाटसे, प्रा.राघव गायकवाड़, प्रा.राजेश गायकवाड़, बौद्धाचार्य सुनिल जाधव अॅड. अनिल मोरे हे सर्व उपस्थित मान्यवर बोलताना म्हणाले की, युवा पिढीने व्यसनांच्या आहारी न जाता व विघातक राजकारणाच्या नादी न लागता उच्च शिक्षण घेऊन आपली प्रगती साधावी व  समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण करावा 
      कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक डॉ. धोंडोपंत मानवतकर बोलताना म्हणाले की, शांत, संयमी, निर्व्यसनी व हुशार असलेल्या अहिंसक वाघमारे यांनी कोणत्याच सोयी सुविधा नसताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही सतत अभ्यासात मग्न राहून जे यश संपादन केले आहे ते अद्वितीय आहे, समाजातील सर्व युवकांनी अहिंसक वाघमारे यांचा आदर्श घ्यावा. 
       याच कार्यक्रमात ललितलेखनाचा बी. रघुनाथ साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ.धोडोपंत मानवतकर यांचा सुद्धा उपस्थितांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
     कार्यक्रमाचे आभार बोद्धाचार्य महेंद्र टेकुळे यांनी मानले
.

शनिवार, १० सप्टेंबर, २०२२

बी.रघुनाथ स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर

बी.रघुनाथ स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर 

प्रा.छबुराव भांडवलकर, डॉ.अशोक पाठक, डॉ. सदाशिव कमळकर, डॉ.धोंडोपंत मानवतकर यंदाचे मानकरी
परतूर /प्रतिनिधी 

परतूर येथील श्री पतंजली आयुर्वेद क्लिनिकच्या वतीने यावर्षीपासून कवी बी.रघुनाथ स्मृती साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत.
      मराठवाड्याचे भूमिपुत्र असलेले कवी बी. रघुनाथ यांचे मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रात फार मोठे योगदान आहे. जालना जिल्ह्यातील सातोना ही जन्मभूमी असलेल्या बी.रघुनाथ या महान साहित्यिकाचा स्मृतीदिन दरवर्षी राज्यातील साहित्यिकांना त्यांच्या नावे पुरस्कार देऊन साजरा करण्यात येणार आहे.  
       यावर्षी कथा, कादंबरी, कविता, वैचारिक लेखन, ललित लेखन आदी साहित्य प्रकाराचे लेखन करणाऱ्या मंठा-परतूर तालुक्यातील लेखकांना बी.रघुनाथ स्मृती साहित्य पुरस्कार देण्यात येणार असून यामध्ये परतूरचे लेखक प्रा.छबुराव भांडवलकर (कादंबरी, कथा), प्रा.डॉ.अशोक पाठक (कविता), प्रा.डॉ.सदाशिव कमळकर (वैचारिक लेखन), व  डॉ.धोंडोपंत मानवतकर (ललितलेखन ) या साहित्यिकांना हे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
      पुरस्काराचे स्वरूप स्मृती चिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे असून हे  पुरस्कार लवकरच एका समारंभात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिकांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील, असे डॉ.दीपक भगवानराव दिरंगे यांनी श्री पतंजली आयुर्वेद क्लिनिकच्या वतीने घेण्यात आलेल्या बी.रघुनाथ स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात जाहीर केले आहे.

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...