शनिवार, १० सप्टेंबर, २०२२

बी.रघुनाथ स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर

बी.रघुनाथ स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर 

प्रा.छबुराव भांडवलकर, डॉ.अशोक पाठक, डॉ. सदाशिव कमळकर, डॉ.धोंडोपंत मानवतकर यंदाचे मानकरी
परतूर /प्रतिनिधी 

परतूर येथील श्री पतंजली आयुर्वेद क्लिनिकच्या वतीने यावर्षीपासून कवी बी.रघुनाथ स्मृती साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत.
      मराठवाड्याचे भूमिपुत्र असलेले कवी बी. रघुनाथ यांचे मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रात फार मोठे योगदान आहे. जालना जिल्ह्यातील सातोना ही जन्मभूमी असलेल्या बी.रघुनाथ या महान साहित्यिकाचा स्मृतीदिन दरवर्षी राज्यातील साहित्यिकांना त्यांच्या नावे पुरस्कार देऊन साजरा करण्यात येणार आहे.  
       यावर्षी कथा, कादंबरी, कविता, वैचारिक लेखन, ललित लेखन आदी साहित्य प्रकाराचे लेखन करणाऱ्या मंठा-परतूर तालुक्यातील लेखकांना बी.रघुनाथ स्मृती साहित्य पुरस्कार देण्यात येणार असून यामध्ये परतूरचे लेखक प्रा.छबुराव भांडवलकर (कादंबरी, कथा), प्रा.डॉ.अशोक पाठक (कविता), प्रा.डॉ.सदाशिव कमळकर (वैचारिक लेखन), व  डॉ.धोंडोपंत मानवतकर (ललितलेखन ) या साहित्यिकांना हे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
      पुरस्काराचे स्वरूप स्मृती चिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे असून हे  पुरस्कार लवकरच एका समारंभात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिकांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील, असे डॉ.दीपक भगवानराव दिरंगे यांनी श्री पतंजली आयुर्वेद क्लिनिकच्या वतीने घेण्यात आलेल्या बी.रघुनाथ स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात जाहीर केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...