" माता रमाईचा त्याग आणि साहस समाजाला प्रेरणादायी "-
डॉ.धोंडोपंत मानवतकर
डॉ.धोंडोपंत मानवतकर,कार्यकर्ते मारोती खनपटे,भीमराव वाघ.
.
मंठा प्रतिनिधी:-
त्यागमूर्ती माता रमाई यांचा त्याग, बलिदान, साहस, संयम आणि सात्विक वृत्ती समाजातील प्रत्येक कुटुंबातील स्त्रीसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर यांनी केले.
मंठा येथे माता रमाबाई आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. मानवतकर म्हणाले की,रमाबाईंच्या संसारात अनेक मोठी संकटे आली, तरी त्या डगमगल्या नाहीत. उलट अनेक संकटातही त्या बाबासाहेबांची सावली होऊन राहिल्या.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ ठेवलेल्या माता रमाईच्या प्रतिमेस सर्व उपस्थीत मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी परतूर येथील ग्रामीण साहित्यिक प्रा.छबुराव भांडवलकर, प्रा.डॉ.सदाशिव कमळकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप चाटसे, पत्रकार राजेश भूतेकर, प्रा.प्रदीप देशमुख, रंगनाथ वटाणे बापू, अॅड अनिल मोरे, हरिभाऊ चव्हाण, सरपंच तानाजी शेंडगे, अशोक अवचार, भीमराव वाघ, मारोती खनपटे, महादेव पाखरे, संजय धुळे, बी.के.प्रधान यांची उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा